परिस्थितीनुसार निर्णय - उद्धव ठाकरेजी आपली मागणी योग्य 


वाचा....सुरेश साळवे लिखित " सत्या" एक वास्तव आणि विस्तावाही.......


अवघ्या मुंबापुरीत लाखो परप्रांतीय नागरिक ज्यांचे रोजीरोजगर हे हातावरचे पॉट असे आहेत. लॉक डाऊन आणि संचारबंदी, तसेच विविध परिसर सील केल्याने या लाखो परप्रांतीय नागरिकांचे उद्योगच बंद पडले आहेत. त्यामुळे दहा बे दहाच्या घरात किमान पाच ते सहा लोकांनी कसे बसूनच राहायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नाईलाजाने संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. आज परिस्थितीनुसार परप्रांतीयांनीही लॉक डाऊन काळात मूळगावी जाणे शक्य नाही. मात्र आता दिड महिन्यापासून हे परप्रांतीय मुंबईतच आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांना मूळगावी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली आहे. याच मागणी सोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही मागणी केल्याने केंद्र यावर विचार करीत आहे. परंतु परिस्थितीनुसार अजितदादा किंवा उद्धव ठाकरे यांची मागणी योग्यच आहे. अन केंद्राने ज्या प्रमाणे लॉक डाऊन करण्याचा योग्य निर्णय राज्याने आणि केंद्राने घेतला. तसाच हा निर्णय येणाऱ्या काळात महत्वाचा ठरणार आहे. तेव्हा उत्तरप्रदेश, राजस्थान, झारखंड, आसाम, बिहार या राज्यातील नागरिकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करणे गरजेचेच आहे. 


कारण दीड महिना हाताला काम नाही, घरात बसून राहावे लागत आहे. हातावरचे पोट, गावाला कुटुंबीय पैसे पाठवतील म्हणून वाट पाहताहेत, आशा कोंडीत सापडलेल्या या परप्रांतीयांचे संयम हा सुटला. उत्तरभारतीय संघाच्या नेत्याने मूळगावी जाण्यासाठी गाडी सुटणार असल्याच्या वृत्ताला एक वृत्तवाहिनीने दुजोरा दिला. अन बांद्रा परिसरातील आसपासच्या परिसरातुन तब्बल अडीच ते तीन हजार परप्रांतीय बोजा बिस्तरा घेऊन मैदानात जमले आणि सरकारपुढे एकाच पेचप्रसंग निर्माण झाला. तर हजारो लोकांनी 500 ते 800 किलोमीटर अंतर दोन हप्ते चालत जाऊन आपले घर गाठले आशा अनेक घटना आहेत. त्यामुळे गाडी यूपीला निघणार आहे म्हणटल्यानंतर इतका मोठा जमाव जमतो. हे पाहून पोलीस आणि सरकारही चक्रावले. या घटनेला पंधरवडा उलटला आहे. आहे कॊरोना मुंबईतून बऱ्यापैकी आटोपला आहे. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी ट्रेनची उपलब्धता करून देणे हे जमेची बाजू ठरणार आहे. त्यांच्या स्थलांतराची मुंबईतील गर्दी  काही प्रमाणात ओसरणार आणि त्यामुळे कॊरोनाला अटकाव करण्यात मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल, नाविमुंबइ परिसरात लाखो परप्रांतीय जे मूळगावी जाऊ इच्छिताहेत त्यांना गावी जाण्यासाठी एक विशेष ट्रेन सोडणे हे शहाणपणाचे धोरण ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राकडे विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केलेली आहे. केंद्र सरकारने मदत केल्यास मात्र राज्याचे हे महत्वाचे ठरणार आहे. 


आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. कारण महाराष्ट्रात आणि मुंबईत, ठाण्यात मोठ्या प्रमाणात स्लॅम परिसर आहे. या स्लॅम परिसरातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक राहतात. मात्र जर परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी केंद्राने विशेष ट्रेन उपलब्ध करून दिली तर निश्चितच कोरोनावर विजय मिळवण्याचा अडथळा दूर होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे आशा शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक राहत आहेत. त्यामुळे कोरोनाने ट्रस्ट झालेली ही शहरे मात्र रिकामी आणि सुटसुटीत होईल आणि लोकांना कोरोटाईन करणे आणि त्यांना कोरोनामुक्त करण्यात मोठी मदत होणार आहे. आज बऱ्यापैकी कॊरोनावर सरकारने मात केलेली आहे. वरळी सारख्या ठिकाणी कॊरोना बधितांचा संख्या मोठी होती. मात्र लोकांनी कोरोनाला हरविण्यात आले आहे. येणाऱ्या काळात कॊरोना रुग्णाची संख्या वाढण्याचा अंदाज केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. मात्र जर विशेष ट्रेन पाठविली तर निश्चितच अंदाज खोटा ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही हे विशेष आहे. कदाचित कोरोनाच्या लढाईत हा निर्णय आणि मागणी हा मोठया बेरीजचे गणित समोर येऊ शकते. यात शंका नाही. यामुळे महाराष्ट्र सरकारवर असलेली जबाबदारी कमी होईल लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था विविध सामाजिक संस्था सह सरकार करीत आहे. तो खर्चही कमी होणार आहे. तर कुटुंबियानापासून दूर राहिलेले परप्रांतीय अशा कठीण समयी परप्रांतीय हे आपल्या कुटुंबासोबत राहतील आणि घरीच राहतील आणि कॊरोना संपविण्यासाठी मदत करतील. त्यामुळे आजच्या परिस्थितीला साजेशा हा उद्धव ठाकरे आणि अजित दादांचा निर्णय आणि मागणी आहे. आता त्यावर विचार करायचा आहे तो केंद्र सरकारला यात शंका नाही. पण हा निर्णय कोरोनाच्या लढाईत महत्वाचा ठरणार हे ही विसरून चालणार नाही.