कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पत्रकारांनीही उचलला 'खारीचा वाटा'
तळेगाव दाभाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीमध्ये निधीची गरज आहे. म्हणून सामाजिक जाणिवेतून प्रथम राष्ट्राला प्राधान्य या उद्देशाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना व उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोरोना विरुध्दच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी खारीचा वाटा तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने उचलण्यात आला आहे.
तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे व सहकारी यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे काल (शुक्रवार) त्यांच्या कार्यालयात जाऊन १० हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.
तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, उपाध्यक्ष तात्यासाहेब धांडे, सचिव अतुल पवार, खजिनदार बी.एम भसे, प्रकल्प प्रमुख सुरेश साखवळकर, सोनाबा गोपाळे, सुनील वाळूंज, श्रीकांत चेपे, मच्छिंद्र बारवकर, परशुराम चव्हाण आदींच्या प्रयत्नांतून उपलब्ध झालेला हा निधी मुख्याधिकारी यांचेकडे सुपूर्द केला.
तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. समाजामध्ये आलेल्या अडचणीला सामोरे जाण्यासाठी नागरिकांना धीर देण्यासाठी तळेगाव शहर पत्रकार संघ कायम त्यांचे पाठिशी खंबीरपणे उभा राहत असतो.